विवेकानंद नगर विहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर याच्या पुतळ्याचे अनावरण.

विवेकानंद नगर विहारात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आबेडकर याच्या पुतळ्याचे अनावरण.


मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


गडचिरोली : बुद्ध जयंतीच्या पावनपर्वावर शाहू नगर, विवेकानंद नगर गडचिरोली येथील प्रबुध्द बुद्ध विहाराच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण पुज्य भंते यशवर्धन यांचे हस्ते आणि बाल युवक श्रामणेर संघाच्या उपस्थीतीमध्ये अणावरण सोहळा पार पडला.



प्रथम आयु अशोकजी वाहणे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.अमरकुमार खंडारे अध्यक्ष,प्रबुद्ध बुद्ध विहार यांचे अध्यक्षतेखाली भारतीय बौद्ध महासभेचे केंद्रीय शिक्षक आयु. अरुण तायडे भुसावळ यांचे उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.


यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष तुलारामजी राऊत, सरचिटणीस प्रा.गौतम डांगे आणि महासभेचे सर्व पदाधिकारी,प्रबुद्ध बुद्ध विहार कार्यकारिणी, रमाई महिला मंडळ, आणि शहरातील बहूसंख्य बौद्ध उपासक, उपासिका, उपस्थित होते.यावेळी भंतेजींनी धम्मदेसना दिली.


दानदात्यांचा बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.विहाराचे अध्यक्ष, अमरकुमार खंडारे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.


कार्यक्रमाला कार्यकारिणीचे उपाध्यक्ष, खेमचंद इंदुरकर, सचिव, सागर मासळकर, सहसचिव, संदिप सहारे,कोषाध्यक्ष, शांतीलाल लाडे प्रेमनाथ सोनटक्के,देवाजी लाटकर,जितेंद्र रायपूरे, सामाजिक कार्यकर्ते शिशुपाल शेंद्रे, आनंदराव दरडमारे उपस्थीत होते.कार्यक्रमाचे संचालन सागर मासळकर यांनी तर आभार खेमचंद इदुरकर यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !