देवाडा येथे ब्राईट किड्स क्रिएटिव्ह समर कॅम्प संपन्न.

देवाडा येथे ब्राईट किड्स क्रिएटिव्ह समर कॅम्प संपन्न.


एस.के.24 तास


चंद्रपूर : लहान मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना चालना मिळावी , त्यांच्यात उत्तम संस्कार रूजावे या हेतूने देवाडा येथील महाकाली नगरीत ब्राईट किड्स क्रिएटिव्ह समर कॅम्प चे आयोजन करण्यात आले होते. माणिक कुटी भवनात झालेल्या या वीस दिवसीय शिबीरात ३ ते १२ वयोगटातील  मुलांना सहभागी करून घेतले होते.एकल गीत गायन,  समुह गीत गायन,  


हिंदी मराठी श्लोक पाठांतर, एकल नृत्य व समुह नृत्य, मेडिटेशन  , कथाकथन, अक्षर सुधार आदी विविधांगी उपक्रम राबविण्यात आले होते. शिबिर संयोजक सौ. रजनी बोढेकर यांनी या  समर कॅम्पचे   आयोजन केले होते. समारोपीय कार्यक्रमात ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, कवी नामदेव गेडकर,प्रा.नामदेव मोरे,निशिगंधा धोंगडे, राकेश बोबडे यांची उपस्थिती होती.

  

गुणवंत शिबिरार्थी म्हणून रूहान विनोद झाडे,  मनस्वी विलास डोंगे, श्रध्दा गणेश मडावी, लिशा लोमेश मीडपेलवार यांना गौरवचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तर शिबिरात विशेष सहकार्य करणारे बंडू टेकाम, कार्तीक चरडे, रिया पिपरीकर आदींना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.सहभागी सर्व शिबिरार्थांना सहभाग प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. 


यावेळी काही शिबिरार्थी व पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली.सूत्रसंचालन कु.रिया पिपरीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन कार्तिक चरडे यांनी केले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !