मृतक,अमोल रोहणकर |
दुचाकी च्या धडकेत एक जण जागीच ठार,तीन जण जखमी चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील घटना.
एस.के.24 तास
चामोर्शी : दोन दुचाकींची आमोरासमोर धडक बसल्याने एक दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना दिनांक 3 मे शुक्रवारी संध्याकाळी 6 : 30 वा.च्या सुमारास आष्टी येथे घडली.
अमोल रोहणकर वय,28 वर्ष रा.किष्टापुर ता.चामोर्शी असे मृत दुचाकी स्वाराचे नाव आहे.
मृत अमोल रोहणकर हा लग्न समारंभात राळापेठ येथे गेला होता कार्यक्रम आटोपून आपली दुचाकी क्र.MH. 33 Z 1028 ने तो परत किष्ठापूर आपल्या स्वगावाकडे जात असताना आष्टी - चामोर्शी मार्गावरील को -ऑपरेटिव्ह बँकेच्या समोर अनखोडा येथुन येत असलेल्या दुचाकी क्र.MH.33.Z 0034 या दुचाकीस्वाराला समोरासमोर जबर धडक दिली.
यात अमोल रोहणकर याचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या दुचाकी वरील व्यक्ती किरकोळ जखमी झाले आहेत जखमींमध्ये सागर दुर्गे वय २३ रा. अनखोडा, गुलचंद दुर्गे वय,14 वर्ष वंश दुर्गे वय,12 वर्ष दोन्ही रा.छल्लेवाडा ता अहेरी असे नावे आहेत.
घटनेची माहिती कळताच आष्टी पोलिस घटना स्थळी दाखल झाले व मृतकाला आष्टी येथील ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले. घटनेचा पुढील तपास आष्टी पोलिस ठाण्याचे ठाणेदार,विशाल काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.