वादळी वाऱ्यात नुकसान झालेल्यांना तातडीने आर्थिक मदत करा. - आमदार डॉ. देवरावजी होळी
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : पोर्ला येथे वादळ वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या कवेलू व टिनाच्या घराचे तातडीनं पंचनामे करण्याची तहसीलदारांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सूचना दिल्यात भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांच्या उपस्थितीत नुकसान झालेल्या घरांची केली पाहणी.
२२ मे रोजी रात्री अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे पोर्ला येथील कवेलू व टिनाच्या अनेक घरांची पडझड झाली यामुळे अनेक कुटुंब उघड्यावर आली असून या नुकसान ग्रस्त घरांचे तातडीने पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाला केली आहे.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना त्यांनी गडचिरोलीचे तहसीलदार व विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून या संदर्भात तातडीने कारवाई करण्याची सूचना केली.
यावेळी लोमेश कोलते, संतोष दशमुखे, अनिल चापले, पांडुरंग भोयर, लोमेश कालसार, संजय निकुरे, गोपाल झोडगे, परशुराम भोयर, नामदेव गेडाम ,शुभम देशमुखे तथा ग्रामस्थ उपस्थित होते.