सायखेडा येथे आर्थिक मदत विजयकिरण फाउंडेशनने दिले माणुसकीचा परिचय.
एस.के.24 तास
सावली : दिनांक ,26 मे 2024 राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी विजयकिरण फाउंडेशनतर्फे आजतगायत ब्रम्हपुरी तसेच राज्यातही अनेक गोर- गरीब व गरजू व्यक्तींना मदत केली आहे व जनसेवा हिच ईश्वर सेवा असल्याचे आपल्या कार्यातून दाखविले आहे,याचं माध्यमातून मानवतेचे दर्शन देत सायखेडा येथे दुर्धर आजाराने मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने ,युवा कांग्रेस उपाध्यक्ष वैभव गुज्जनवार, कृ.उ.बा संचालक मा.खुशालजी लोडे यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सायखेडा येथील स्व.राजू बुध्दाजी मेश्राम वय २७ वर्षे हा तरुण शिक्षण घेत असताना कुटुंबाला मदत व्हावी या उद्देशाने कमवा आणी शिका या तत्वावर आपले कार्य वाहत होता, घरातील आर्थिक परिस्थिती कमजोर, वडील बुध्दाजी मेश्राम भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
स्व.राजू मेश्राम यांची वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता उपचारा दरम्यान त्यांचे आकस्मित मृत्यु झाले. घरातील कर्ता तरुण मुलगा गेल्याने मेश्राम कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली, आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना जेष्ठ काँग्रेस कार्यकता मा.विठ्ठल मंगर,मा.वामन वाघरे,सुलोचनाताई वाघरे,मा.विजय मेश्राम आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.