घोडेवाही येथे बुद्ध मुर्तीचे अनावरण पंचशील हे बौद्ध धम्माचा पाया आहे. - सिद्धार्थ सुमन
मुनिश्वर बोरकर - कार्यकारी संपादक
सावली : तथागत भगवान बुध्दाचा धम्म महामानवाच्या दुःख मुक्तीचा वैज्ञानिक मार्ग असून पंचशील बौद्ध धम्माचा पाया आहे. असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी चे प्रदेश सरचिटणीस सिद्धार्थ सुमन यांनी केले.घोडेवाही ता.सावली येथे बुद्ध मूर्ती अनावरण कार्यक्रमात बोलत होते.
तथागत भगवान बुद्धा ने मानवा च्या दुःख मुक्ती चा मार्ग दिलेला आहे.द्वेष,मोह आणि लोभ यामुळे मानव दुःखी होतो. यातून मुक्त होण्यासाठी सम्यक जीवन जगले पाहिजे.त्याकरिता पंचशील चे पालन करणे आवश्यक आहे.असे शिद्धार्थ सुमन यांनी सांगितले.
या प्रसंगी भंदन्त ज्ञानज्योती यांनी धम्मदेशना करतांना सांगीतले की डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान, रिपलिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बौद्ध धम्म हे जातविरहित समाज निर्मिती चे साधन आहेत.यात जातीला स्थान नाही.म्हणून जातीआधारित आंदोलन हे आंबेडकरी आंदोलन होऊ शकत नाही असेही ते म्हणाले.
तथागत बुद्ध रूपाचे अनावरण पूज्य भदन्त ज्ञानज्योती महाथेरो आणी संघ संघारामगिरी ता. चिमुर यांचे हस्ते करण्यात आले. भन्ते ज्ञानज्योती यांनी उपस्थित उपासक, उपासिकांना धम्मदेशना दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते रिपब्लिकन पार्टी जिल्हा चंद्रपूरचे अध्यक्ष,गोपाल रायपुरे होते. कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणुन रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली चे अध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर,शेडयुल कॉस्टस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.विनय बांबोळे, बामसेफचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष,भोजराज कानेकर उपसरपंच,चेतन रामटेके घोडेवाही,तलाटी,भास्कर मेश्राम, आदिनी बौद्ध धम्माप्रती मार्गदर्शन केले .
या प्रसंगी ॲड.विनय बांबोळे म्हणाले की,ऐकतांना लोकांची मानसिकता बदलली आहे.आज गित गायनातुन प्रबोधन होत आहे.परंतु रिपाईच्या जिल्हा नेत्यांना डावलून चालणार नाही.कारण तुमच्या समस्या आम्हीच सोडवू शकतो.गोपाल रायपूरे म्हणाले की घोडेवाही बौद्ध बांधवाचे आभारच मानावे लागेल कारण त्यांनी इतर पक्षाच्या मोठ्या नेत्यांना न बोलविता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरा केला.
रात्रौ प्रबोधनकार विजय शेंन्डे यांच्या भिम गिमाचा कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाचे संचालन,अमित वाकडे यांनी तर आभार मंडळाचे सचिव,मुकेश दुधे यांनी केले. कार्यक्रमास बहुसंख्य बौद्ध बांधव उपस्थित होते.