ने.हि.विद्यालय,ब्रम्हपुरीचे एस.एस.सी.परीक्षेत सुयश.

ने.हि.विद्यालय,ब्रम्हपुरीचे एस.एस.सी.परीक्षेत सुयश.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक


ब्रह्मपुरी : दिनांक,२७/०५/२४ नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित ने.हि. विद्यालय, ब्रम्हपुरीचा इयत्ता १०वी बोर्ड परीक्षेचा निकाल ९४.५८ टक्के लागला असून विद्यालयाने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे.


ने.हि.विद्यालय, ब्रम्हपुरी येथून विशाल उत्तम जनबंधु  हा विद्यार्थी ९४ टक्के गुण प्राप्त करून विद्यालयातून प्रथम आला आहे. दिनेश सुखदेव निकोडे हा विद्यार्थी ९३  टक्के गुण घेऊन द्वितीय, ओजस विजय झोडे हा विद्यार्थी ९१.८० टक्के गुणांसह तृतीय, अनय सुनिल बुग्गावार हा विद्यार्थी ९१.६० टक्के  गुण घेऊन चौथा, लोकेश राजू तुपट हा विद्यार्थी ९१ टक्के गुण घेऊन पाचवा, यश मनोज बन हा विद्यार्थी ९०.८० टक्के  गुंणांसह सहावा आला आहे.


सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव श्री अशोकजी भैया तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य जी.एन.रणदिवे, उपप्राचार्य के.एम.नाईक,पर्यवेक्षक ए.डब्ल्यू.नाकाडे,  सर्व शिक्षकवृंद व प्रशासकीय कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व विद्यार्थ्यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी  शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !