दत्तात्रय समर्थ यांची सामान्य कामगार सेवाच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी निवड.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : राजकीय, सामाजिक,व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मंडळींनी केले समर्थंच्या नियुक्तीचे स्वागत केले. मुल विशेष प्रतिनिधी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेल शहर अध्यक्ष तथा राष्ट्रीय लोकहित सेवा कार्याध्यक्ष चंद्रपूर,दत्तात्रय एस.समर्थ यांची सामान्य कामगार सेवाच्या विदर्भ कार्याध्यक्षपदी एकमताने निवड झाली आहे.सामाजिक क्षेत्रात सदैव अग्रेसर असणाऱ्या समर्थ यांनी आजपावेतो केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना या महत्त्वाच्या पदाची संधी देण्यात आली.
असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे. त्यांच्या नियुक्तीचे अनेकांनी स्वागत केले असून विदर्भातील राजकीय सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळींने समर्थ यांचे अभिनंदन केले आहे.दरम्यान त्यांनी गेल्या तीन महिन्यांत अनेक प्रकरणांबाबत पाठपुरावा करत शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले.हे येथे विशेष उल्लेखनीय आहे.त्यांनी पाठपुरावा केलेल्या काही प्रकरणात नुकत्याच वरिष्ठस्तरांवरुन चौकश्या सुरू झाल्या आहेत.
चंद्रपूर जिल्हाच्या शिवणी येथील वनपरिक्षेत्रातील प्रकरणाबाबत त्यांनी आपला बुलंद आवाज करत थेट राज्याचे मुख्यमंत्र्यांकडे उपरोक्त प्रकरणातील गैरप्रकाराची विशेष पथकव्दारे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली असल्याचे सर्वश्रूत आहेत.या शिवाय मरेगांव येथील प्रदुषणाबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.