१७ दिवसांपासून बंद असलेली बस तात्काळ सुरु करा. - आम आदमी पार्टी, राजुरा ची मागणी.
एस.के.24 तास
राजुरा : राजुरा तालुक्यातील मूर्ती या गावी (राजुरा- सिंधी- मूर्ती) या मार्गाने येणारी एस टी बस दिनांक- १८/०४/२०२४ पासून येत नसल्याने याबाबत मूर्ती येथील नागरिकांनी आम आदमी पार्टी चे कामगार जिल्हाध्यक्ष श्री. सुरजभाऊ ठाकरे यांना याबाबत तक्रार करताच देतात सदर समस्येची तात्काळ दाखल घेऊन एस टी महामंडळ कार्यालय, राजुरा येथील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता बस न येण्याचे कारण महाकाली मंदिर चंद्रपूरच्या यात्रेकरिता बस गेली असल्याने गावात बस येत नाही आहे.! असे सांगण्यात आले.
करिता या भागातील नागरिकांना प्रवासाकरिता नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आगार व्यवस्थापक यांना याबाबत निवेदन द्वारे जिल्हाध्यक्ष यांनी व्यवस्थापकांना सांगितले की आमचा यात्रेत बस पाठवण्याला निश्चितच विरोध नाही परंतु गावातील नागरिक तथा विद्यार्थी यांची प्रवासाकरिता गेल्या १७ दिवसांपासून जी गैरसोय सोय झाली आहे ती मानवतेच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार करून नागरिकांना परत असा त्रास होऊ नये ही जबाबदारी देखील आपली असल्याने तात्काळ बस सुरू करण्यात यावी.
तथा गावातील विद्यार्थ्यांना पास ची सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने येथील नागरिकांची व विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये व येथील नागरिकांना देखील शासकीय योजनांचा लाभ मिळावा करिता तात्काळ सदर समस्या मार्गी लावणा करिता श्री.सुरजभाऊ ठाकरे यांनी आगार व्यवस्थापकांना सांगतच परत तात्काळ बस सुरू करण्याकरिता आम्ही पावले उचलतो अशी त्यांनी विश्वास दिला.
यावेळेस निवेदन देताना आम आदमी पार्टी तथा जय भवानी कामगार संघटनेचे पदाधिकारी श्री. अनिकेत मेश्राम, रोशन बंडेवार, महेश ठाकरे, मयूर गेडाम, रोहित पुल्लिवार, युगन वाघमारे आधी पदाधिकारी उपस्थित होते.