ने.हि.महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज पुण्यतिथी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : ७/५/२४ थोर समाजसुधारक व आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त ब्रह्मपुरीच्या नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकरांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.
सर्वप्रथम महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुन अधीक्षक संगीता ठाकरेंनी फोटोला माल्यार्पण करुन अभिवादन केले.याप्रसंगी समिती प्रभारी डॉ.कुलजित शर्मा,डॉ.रतन मेश्राम,प्रा धिरज आतला,रुपेश चामलाटे, रोशन डांगे,शशिकांत माडे,दत्तू भागडकर,प्रज्ञा मेश्राम,सुषमा राऊत,संचू मेश्राम इ.मान्यवरांनी पुष्प वाहून महाराजांना अभिवादन केले.