विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दीड लाखांचे बक्षीस असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे.


विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दीड लाखांचे बक्षीस असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. 


एस.के.24 तास


सिरोंचा : विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या एक जहाल नक्षल समर्थकास पोलिसांनी अटक केली आहे. शंकर वंगा कुडयामी वय,३४वर्ष,असे अटकेतील नक्षल समर्थकाचे नाव असून,तो छत्तीसगड राज्यातील बिजापूर जिल्ह्यातील कांडलापार्ती येथील रहिवासी आहे.


सिरोंचा येथील पोलीस आणि विशेष अभियान पथकाच्या जवानांनी त्याला सिरोंचा - कालेश्वरम मार्गावर लावलेल्या नाकेबंदी दरम्यान अटक केली.शंकर हा कट्टर नक्षल समर्थक होता.नक्षल्यांना राशन पुरविणे, नक्षल्यांचे बॅनर लावणे,गावातील नागरिकांना बैठकीसाठी बोलावणे अशी कामे तो करीत होता.२०१५ पासून तो नॅशनल एरिया कमिटीत भरती झाला. 


चार चकमकींमध्ये त्याचा सहभाग होता.२०२२ मध्ये छत्तीसगडमधील मोरमेड - चिंतलपल्ली आणि २०२३ मध्ये बडा काकलेर व डम्मूर-बारेगुडा जंगलात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेलया चकमकीत तो सहभागी होता. शिवाय यंदा गडचिरोली जिल्ह्यातील लिंगमपल्ली-मोदुमडगू जंगलात झालेल्या चकमकीतही त्याचा सहभाग होता,ज्यात चार नक्षली ठार झाले होते.२०२४ मध्ये कोरंजेड,कचलेर आणि छत्तीसगडमधील भोपालपट्टनम येथील प्रत्येकी एक अशा तीन निरपराध नागरिकांच्या हत्येत त्याचा सहभाग होता,अशी माहिती पोलिसांनी दिली.


पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक यतीश देशमुख,कुमार चिंता,एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत पोलिसांनी ७९ नक्षल्यांना अटक केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !