बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोरटी मक्ता येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार.


बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोरटी मक्ता येथील गुराखी वाघाच्या हल्ल्यात ठार.


एस.के.24 तास


बल्लारपूर : गुराख्याला वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना मंगळवारी बल्लारपूर तालुक्यातील कळमना नियतक्षेत्रात घडली.वामन गणपती टेकाम वय,59 वर्ष रा.कोरटी (मक्ता) असे मृताचे नाव आहे.


बल्लारपूर तालुक्यातील मौजा कोरटी मक्ता येथील वामन टेकाम सकाळी 8:30 च्या सुमारास नियतक्षेत्र कळमणा येथील वनात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते. दुपारी बारा वाजताच्या सुमारास त्यांच्यावर वाघाने हल्ला केला. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. 


माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्हारशाह (प्रादे) पथकासह घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेवून शवविच्छेदनाकरिता पाठवण्यात आलामृताच्या नातेवाईकास तात्पुरती आर्थिक मदत करण्यात आली. वनविभागाने या परिसरात गस्त वाढवली असून वाघाचा शोध घेण्याकरिता २० ट्रॅप कॅमेरे व एक लाईव्ह कॅमेरा लावण्यात आला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !