सिंदेवाही तालुक्यातील घटना ; जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले ठार.

सिंदेवाही तालुक्यातील घटना ; जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला करून केले ठार.


एस.के.24 तास


सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील कारघाट च्या जंगलात तेंदुपाने तोडण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केला असता घटनास्थळीच मृत्यू झाला.मृत व्यक्तीचे नाव प्रभाकर वेठे आहे.दरम्यान या घटनेनंतर ग्रामस्थांनी वाघाच्या बंदोबस्ताची मागणी लावून धरण्याने तणाव निर्माण झाला आहे.


सिंदेवाही पोलीस ठाणे हद्दीत वन विभाग कारघाटा कंपार्टमेंट नंबर २५७ मधील कच्छेपार कारघाटा जंगल परिसरात प्रभाकर अंबादास वेठे वय,48 वर्ष  रा.डोंगरगाव ता सिंदेवाही हे जंगल परिसरात तेंदू पत्ता तोडण्यासाठी गेले असता वाघाने हल्ला करून त्यांना ठार मारले.


त्यानंतर वन व पोलीस पथक तात्काळ सदर ठिकाणी पोहोचून पंचनामा केला.वन विभागाच्या मदतीने जमलेल्या जमावाला परत पाठवून तात्काळ मृतदेह ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे रवाना केले.सदर ठिकाणी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. परिसरात शांतता आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !