मेट्रोत नोकरी देण्याचे आमिष सुरक्षा रक्षकच निघाला आरोपी.
एस.के.24 तास
नागपूर : नागपूर मेट्रोत नोकरी लावून देण्याचे खोटे अमिश दाखवत बेरोजगारांना लुबाडणाऱ्या सुरक्षा रक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.रुपेश शेंडे नावाच्या या सुरक्षा रक्षकाने अक्षय नगराळे नावाच्या आपल्या नातेवाईकाकडून मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत 50,000 रुपये घेतले होते.आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर अक्षयने अजनी पोलीस ठाण्यात या संबंधी तक्रार केली होती.
या संपूर्ण प्रकरणाची नागपूर मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली.या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आऊट सोर्सिंग एजन्सीला दिले.एजन्सी रुपेश शेंडेचे या प्रकरणा संबंधी बयान नोंदवले. कबुलीजबाब देत रुपेश शेंडेने आपणं अक्षय नगराळे कडून पैसे घेतल्याचे मान्य केले.
त्याला कंत्राटदाराने निलंबित केले. पैशांची मागणी करत महा मेट्रोत नोकरी लावून देण्याचे आमिष दिले जाण्याचे आणि अशा प्रकारे फसवणुकीचे प्रकार शहरात होत असून नागपूर मेट्रोने या संबंधित नागरिकांना सातत्याने सतर्क केले आहे. अश्या कुठल्याही पद्धतीने नागपूर मेट्रोत नोकरी मिळत नाही, असे स्पष्ट केले.