राजगिरी बुद्ध विहारात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न.
एस.के.24 तास
चंद्रपूर : तुकूम येथील संविधान चौकातील राजगिरी बुद्ध विहारात तथागत भगवान बुद्ध यांच्या जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, धम्म अभ्यासक शेषराव सहारे, धम्ममित्र नामदेव गेडकर , हिरामण भोवते,दशरथ चांदेकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पहिल्या सत्रात तथागत भगवान बुद्ध यांच्या धम्म विचारांच्या अनुषंगाने शेषराव सहारे यांनी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले तर आजच्या आधुनिक काळात बुद्ध विचारांची गरज यासंबंधीची ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांनी विचार व्यक्त केले .तर दुसऱ्या सत्रामध्ये विविध स्पर्धांमध्ये विजेत्या ठरलेल्या गुणवंतांचा गौरव करण्यात आला.
प्रश्नमंजुषा स्पर्धेत सिध्दांत रामटेके, अध्वेश कुईटे, आर्यन पाटील तर वेशभूषा स्पर्धेत अनुष कांबळे, अथांग रायपुरे यांना पारितोषिक देण्यात आले. संगीत खुर्ची स्पर्धेत युक्ता शिंदे, सोनाली कवाडे, अथांग रायपुरे, दीक्षा शिंगाडे, अनुसया सागोरे तर मेणबत्ती सजावट स्पर्धेत विद्या टिपले, तारा वनकर, उषाताई मेश्राम यांना सन्मानित करण्यात आले.
गीत गायन स्पर्धेत विद्या टिपले, आम्रपाली शिंदे आणि स्वरा क-हाडे यांना सन्मानित करण्यात आले तर नृत्य स्पर्धेत प्रांशी सोळंकी, परिणिती काकडे , स्वरा क-हाडे यांना सन्मानित करण्यात आले तर रांगोळी स्पर्धेत अभिज्ञा टिपले, प्रियांका गेडाम यांना बक्षिसे मिळाली.
तसेच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शिष्यवृत्ती योजना परीक्षेत विशेष गुणांनी उत्तीर्ण झाल्याबद्दल तमन्ना रायपुरे, तन्वीर खोब्रागडे, तेजस रामटेके,पियुष घुटके, सिद्धांत रामटेके, सिमरन चिमणकर,श्रमण कासोटे, भावेश बरके आदींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन दिपक गणवीर यांनी केले.
तर आभार प्रदर्शन उषाताई मेश्राम यांनी केले. राजगिरी बुद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष भाऊराव सागोरे, सचिव राजेश वाकडे तथा महिला उपाध्यक्ष कुसूमताई माऊलकर आणि सक्रिय सामाजिक कार्यकर्ता प्रविण वाकडे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.