ब्रम्हपूरी येथे १४ मे रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीचे आयोजन.
★ राज्याचे विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार, सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत यांची राहणार विशेष उपस्थिती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१२/०५/२४ ब्रम्हपूरी येथील शिवछत्रपती फाउंडेशनच्या वतीने १४ मे रोजी सायंकाळी ६:३० वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन ब्रम्हपूरी येथील झांसी राणी चौक येथे करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी,प्रेरणादायी वक्ता,मित्र वनव्यामध्ये गारवा फेम अनंत राऊत यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे असणार आहेत. सह उद्घाटक म्हणून नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती विलास विखार तर अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ,देवेश कांबळे हे राहतील.
प्रमुख अतिथी म्हणून ओबीसी विचारवंत भाऊराव राऊत, बहुजन विचारवंत प्रा.चंदन नगराळे, मराठा सेवा संघाचे खेमराज तिवाडे, माजी नगरसेवक सचिन राऊत, रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. राकेश तलमले, गौतम राऊत,आकाश खंडाळकर, सामाजिक कार्यकर्ता निनाद गडे, प्रा.अंकुश मातेरे, सामाजिक कार्यकर्ता नामदेव मेश्राम, सामाजिक कार्यकर्ता विलास दुपारे हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शिव छत्रपती फाउंडेशनचे अध्यक्ष जगदीश उर्फ मोंटु पिलारे यांसह पदाधिकाऱ्यांनी केले आहे.