मरेगांव येथील वाढत्या प्रदूषणामुळे नागरिक हैराण ; दत्तात्रय समर्थं नी केली वरिष्ठांकडे तक्रार दाखल.
★ प्रदुषण नियंत्रण मंडळ मात्र अद्याप गप्पच ?
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील मरेगांव येथील जी.आर.क्रिष्णा फेरो ॲलाय कंपनी बाबत एकदा नव्हे तर तीनदा चंद्रपूर नियंत्रण मंडळाकडे प्रत्यक्षात शिष्टमंडळासह जावून लेखी तक्रार सादर केल्यानंतरही या बाबतीत प्रदुषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी चौकशी करण्यासाठी टाळाटाळ का करीत आहे असा सवाल सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष,दत्तात्रय समर्थ यांनी आज उपस्थित केला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून उपरोक्त कंपनी या ठिकाणी विटा तयार करण्याचे काम करीत असून विटासाठी वापरण्यात येणाऱ्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणाचा त्रास नागरिकांना जाणवू लागला आहे.तक्रारी सादर केल्यानंतरही या कडे महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जातीने लक्ष पुरवित नसल्याचा आरोप समर्थ यांनी केला आहे.दरम्यान त्यांनी या बाबतीत नागपूर महसूल आयुक्त व चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या कडे एक लेखी तक्रार सादर केली असल्याचे त्यांनी सांगितले .
आपण या बाबतीत परत एकदा लेखी तक्रार राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचे ते म्हणाले.तक्रार करुन देखील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ गप्प का ? असा प्रश्न प्रत्येकांना पडला आहे.या मागचे नेमके कारण काय ?