पालेबारसा येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.

पालेबारसा येथील कॅन्सरग्रस्त रुग्णास विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे आर्थिक मदत.


 एस.के.24 तास


सावली : दिनांक,24 मे 2024 तालुक्यातील मौजा.पालेबारसा येथील कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने ,युवा कांग्रेस उपाध्यक्ष वैभव गुज्जनवार, कृ.उ.बा संचालक मा.खुशालजी लोडे यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.


पालेबारसा येथील सुनंदा सुधाकर भगत वय ५० वर्षे ह्या भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले.


घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली,पुढील उपचारासाठी  त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.


आर्थिक मदत देताना पालेबारसा ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा.रमेश खेडेकर,मा.रमेश तिवाडे,मा.वसंत उईके,मा.प्रशांत चिमुरकर,मा.प्रमोद भगत आदी काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !