जागतिक तंबाखू विरोधी दिवस शपथ देऊन साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम उपजिल्हा रुग्णालय, ब्रम्हपुरी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा चंद्रपूर अंतर्गत जागतिक तंबाखू विरोधी दिवस निमित्ताने जनजागृती आयोजित करण्यात आली होती.वैदयकिय अधिक्षक डॉ.निखिल डोकरीमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आरमोरी रोड बस स्थानक, ब्रम्हपुरी येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या समुपदेशक अंजिरा आंबीलदुके
नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदिप कटकुरवार सामाजिक कार्यकर्ते अशोक नाकतोडे यांची उपस्थिती होती.अंजिरा आंबीलदुके समुपदेशक यांनी तंबाखू गुटखा सिगारेट सेवन करण्या-या व्यक्तीस होण्या-या आजारांवर प्रकाश टाकला.नशाबंदी मंडळाचे जिल्हा संघटक संदिप कटकुरवार यांनी या वर्षी जागतिक आरोग्य संघटनेने प्रस्तावित केलेली थीम "तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून मुलांचे संरक्षण" या थीमवर व कोटपा -२००३ वर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले.
बेटाळा काॅलेज ऑफ फार्मसी ब्रम्हपुरी या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली.तंबाखू विरोधी शपथ व तंबाखू गुटखाचे दुष्परिणामा बाबतचे पत्रक वाटप करण्यात आले.सदर कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते अशोक नाकतोडे नारायण मेश्राम बेटाळा काॅलेजचे प्रा.पायल मॅडम व विद्यार्थी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.