मोहोर्ली मो.येथील विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी ठरले पात्र.
एस.के.24 तास
चामोर्शी : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहोर्ली मो. येथील दोन विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
मोहोर्ली मो.येथील मोहित अलाम,याने नवोदय विद्यालय घोट येथे आपला प्रवेश निश्चित केलेला आहे.तसेच उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत संस्कृती जवादे,मोहित अलाम यांनी भरारी घेतली आहे.मोहित अलाम हा विदयानिकेतन स्कुलसाठी पण पात्र झाला आहे. तसेच आदर्श कुसराम व मोहित अलाम यांनी एकलव्य मॉडेल स्कुल प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केले आहे.
गेल्या शैक्षणिक सत्रात शाळेची पटसंख्या 80 होती व दोनच शिक्षक कार्यरत होते. तरीपण मारोती आरेवार यांनी मुख्याध्यापक व वर्गशिक्षक अशी दुहेरी भूमिका बजावली. दोन वर्ग आणि मुख्याध्यापक पद सांभाळून, शिष्यवृत्ती व नवोदयचे अधिकचे वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना हे यश मिळवून दिले.भेंडाळा केंद्रात उपक्रमशील शाळा म्हणून मोहोर्ली शाळा गणल्या जाते.
लोकवर्गणीतून शाळेच्या बोलक्या भिंती, दप्तरमुक्त शनिवार,स्पर्धा परीक्षेचे जादा वर्ग, सराव चाचणीचे आयोजन शिक्षकांनी राबवलेल्या या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले. यासाठी शिक्षक प्रभाकर गव्हारे व कान्होली हेटी येथील शिक्षक मदन आभारे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल बिडीओ पाटील सर,बिईओ नरेंद्र मस्के, विस्तार अधिकारी यशवंत टेम्भूर्णे,केंद्रप्रमुख पुरषोत्तम पिपरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गुणवंत झरकर व सदस्यांनी कौतुक केले आहे.