कोंडेखल येथिल वन जमिनिवरील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेस स्थगिती द्यावी. ★ अतिक्रमण लाभार्थ्यांची मागणी,ग्रा.पं.तहसीलदार,वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले निवेदन.

कोंडेखल येथिल वन जमिनिवरील अतिक्रमण हटविण्याच्या प्रक्रियेस स्थगिती द्यावी.


अतिक्रमण लाभार्थ्यांची मागणी,ग्रा.पं.तहसीलदार,वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिले निवेदन.


एस.के.24 तास


सावली : सावली तालुक्यातील मौजा कोंडेखल येथील अतिक्रमण धारक सन १९५० पासूनमहसूल विभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून उत्पादन घेत आहेत. त्याची नोंद अतिक्रमण नोंदवहीवर दाखविण्यात आलेली आहे.


 नंतर महसूल विभागांनी सन १९६३ ला सदर जमिन वनविभागाकडे हस्तांतरण केल्याने त्या जमिनीवर भोगवटदार म्हणून सरकार महाराष्ट्र शासन वन' विभाग अशी नोंद७/१२ वर दाखविण्यात आलेल्री आहे. सदर जमिन वन विभागाकडे हस्तांतरण झाली असली तरी त्याजमिनीवर जंगल अस्तीत्वात नसल्याने कोंडेखल येथील भूमिहीन शेतमजुरांनी अतिक्रमग करून उदरनिर्वाहाचे साधन' तयार केले. 


मात्र वनविभागाने येथिल अतिक्रमण धारकांच्या शेतात बुलडोझर लावून शेती उध्वस्त केल्याने त्यांचे संसार उघड्यावर पडले आहे . त्यामुळे येथिल अतिक्रमण धारकांनी स्थानिक ग्रामपंचायत , तहसीलदार सावली , आणि वनपरिक्षेत्र अधिकारी सावली यांना लेखी निवेदन देऊन अतिक्रमण हटाव मोहीम थांबविण्यासाठी मागणी केली आहे . 


ज्या लोकांनी अतिक्रमणाची नोंद महसूल विभागाकडे केली त्यांना शासनांनी सन १९७८-७९ मध्ये अधिकृत शेतजमिनीचे पट्टे देऊन जमिन वाटप' केल्ली. परंतु काही लोकांनी महसूल विभागाकडे नोंद न करता फक्त वहिवाट करून उत्पन्न घेत राहिले. त्यामुळे त्यांना


अजूनही पट्टे मिळालेले नाही. परंतु केंद्र सरकारनी वन अधिनियंम २००६ लागू करुन सन २००५पर्यंतचे अतिक्रमन  कायम करून पट्टे देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कोंडेखल येथील अतिक्रमनधारकांनी पट्टया करीता वनविभाग व महसूल विभाग कडे पट्ट्याची मागणी करणारा प्रस्ताव सादरकेलेला आहे. परंतु पट्टे देतांना आदिवासींना प्रथम प्राधान्य देऊन पट्टे वाटप करण्याचे धोरण


राबविले व इतरांना तिन पिढ्यांची अट लागू' करून अजूनही त्यांना  पट्ट्याचे वाटप केलेले नाही. त्यामुळे सन१९५० पासून अतिक्रम करून देखील बऱ्याच लोकांना कायमस्वरूपी पट्टे मिळालेले नाही .कोंडेखल ग्रामपंचायतने १९५० पासून अतिक्रमणकेलेल्या नागरिकांच्या जमीनीवरील अतिक्रमन हटविण्याची मागणी केल्याने व सततच्या पाठपुरावा करून अतिक्रम हटविण्याची मागणी रेटून धरल्याने नाईलाजास्तव वनविभागाला अतिक्रम हटविण्याची मोहीम राबवाची लागल्ली.


हे जरी खरेअसले तरी झालेली कार्यवाही नियमबाह्य असल्याची तक्रार अतिक्रमित ल्राभार्थी केली असून , ग्रामपंचायत ने अतिक्रमण हटविण्या बाबत दिलेला ठराव राजकिय हेतूने प्रेरित असून अतिक्रमन धारकावर अन्याय करणारा असल्याने नव्याने ग्रासभेचा ठराव घेण्यात यावा. 



तसेच वनव्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने ग्रामसभा बोलावण्याची जबाबदारी वनविभागाने घेऊन ग्रामपंचायत ला नव्याने ग्रामसभा घेण्यासाठी पत्र द्यावे व नवीन ठरावानुसारच अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी रिपाईचे जिल्हाध्यक्ष,गोपाल रायपुरे,किशोर उंदिरवाडे,रमेश सहारे,संतोष उंदिरवाडे,जावेद उंदिरवाडे,विनायक ठुनेकर,लिंगाजी शेंडे,साईनाथ भोयर,इत्यादी नि तहसीलदार सावली,वनपरिक्षेत्र अधिकारी सावली,व ग्रामपंचायत कार्यालय कोंडेखल यांना लेखी निवेदन देऊन केली आहे.



#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !