बारावी परीक्षेतील यश कु.एकता दिनेश जुमडे चे केले राष्ट्रीय लोकहितचे दत्तात्रय समर्थ व सहज सुचलंच्या मुख्य संयोजिका रंज्जू मोडक यांनी अभिनंदन.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
मुल : नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत चंद्रपूर शहरातील कु.एकता दिनेश जुमडे ह्या विद्यार्थींने घवघवीत यश संपादन केले आहे.दरम्यान आज शुक्रवार दि.24 मे ला राष्ट्रीय लोकहित सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष, दत्तात्रय एस.समर्थ यांनी तिच्या जटपूरा वार्ड येथील निवास स्थानी भेट देवून तिचे अभिनंदन केले.
तसेच कला,साहित्य,सामाजिक क्रीडा व शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या महिला व तरुणींना सदैव प्रोत्साहित करणा-या तथा जेष्ठ मार्गदर्शिका असलेल्या मायाताई कोसरे व अधिवक्ता मेघा धोटे यांच्या नामवंत सहज सुचलं महिला व्हाॅट्सअप गृप चंद्रपूर च्या मुख्य संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनीही कु.एकता जुमडे हिला पुष्पगुच्छ देत तिचे अभिनंदन केले व तिला उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व शुभकामना दिल्या.
या वेळी शहरातील महिला सामाजिक कार्यकर्त्या चंदा ईटनकर,अनिता झाडे,कल्पना गिरटकर,वंदना रागिट,कविता दिकोंडावार या शिवाय पडोलीचे जेष्ठ नागरिक पुंडलिक गोठे,पुष्पाताई चकोले,पल्लवी जुमडे,दिनेश जुमडे ,सहज सुचलं व राष्ट्रीय लोकहित सेवाचे काही पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.