भारत बौद्धमय करायचे असेल तर बुद्धासारखी क्रांती करावी लागेल. - भोजराज कान्हेकर
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली : तथागत बुद्धानी क्रांती करूनच भारत बौद्धमय केला. आपणाला बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा लागेल तरच डॉ. बाबासाहेबांनी केलेले बौद्ध धम्माचे कार्य आपणालाही थोडाफार करता येईल.
पंचशील बुद्ध विहार रामनगर येथे बुद्ध जयंतीचा कार्यक्र मात मंडळाचे अध्यक्ष खोब्रागडे हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक बामसेफ चेगडचिरोली जिल्हाध्यक्ष भोजराज कानेकर,धम्ममित्र विजय पाटील 'डॉ.उज्वला शेंडे.पंचशिल महिला मंडळाच्या अध्यक्षा साधना मनवर तर सचिव सुरागिनी भसारकर आदि लाभले होते.
सुरुवातीला ध्वजारोहण करून त्रिसरण व पंचशील ग्रहण करण्यात आले.त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.भोजराज कानेकर म्हणाले की, बुद्ध हे क्रांतिकारी होते.२५०० वर्षांपूर्वी बुद्धाने क्रांती करून बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मंत्र देऊन सर्व भारत संपन्न केला.त्यामुळे संपूर्ण भारत बौद्धमय झाला .
परंतु आता सध्याच्या काळात बुद्धाकडे भक्ती मार्गाने पाहिले जाते. भारत बौद्धमय करायचा असेल तर बुद्धासारखी क्रांती करावी लागेल.धम्ममित्र विजय पाटील म्हणाले की ,शिलाचे आचरण केले तर मानव दुःख मुक्त होतो.बुद्धाने विचाराच्या बळावर भारत बौद्धमय केले.
आपल्याला सुद्धा भारत बौद्धमय करण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल.डॉक्टर उज्वला शेंडे म्हणाले की ,तथागताने दिलेला धम्म हा स्वातंत्र्य,समता,बंधुता व न्यायावर आधारित आहे.आपल्याला सुद्धा समाजात स्वातंत्र्य ,समता ,बंधुता व न्याय निर्माण करायचे आहे.
या कार्यक्रमाचे संचालन डि.ए.मेश्राम यांनी केले तर आभार केशव शेंडे यांनी मानले.