उन्हाळी हंगामातील धानपिकाची कापणी करतांना शेतकऱ्यांचा अचानक मृत्यु.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
कुरखेडा : उन्हाळी हंगामातील धानपिकाची कापणी करतांना शेतकऱ्यांचा अचानक मृत्यु झाल्याने गावात एकच खळबळ उडाली.कुरखेडा तालुक्यातील अरततोंडी गावातील शेतकरी दि.१९ मे ला सकाळी ७ वाजता आपल्या कुटुंबासोबत शेतात धानाची कापणी करीत असतांना चंद्रशेन धांडे वय,५० वर्ष असे मय्यत शेतकऱ्याचे नाव असून अचानक त्यांचा मृत्यु झाला.
चंद्रसेन धांडे हा मुळचा चंद्रपूर जिल्हा ब्रम्हपुरी तालुक्यांतील पिंपळगांव (भोसले) होय त्यांची दोन एकर शेती अतरतोंडी गावात होती तो शेतीवर आपले उदरनिर्वाह करीत होता.शेतात धान कापणी करीत असतांना अचानक त्यांची प्रकृती बिघडली तो जमीनीवर कोसडला व तिथेच त्याचा मृत्यु झाला.
कुटुंबियांनी दवाखाण्यात नेत असतांना त्याचा मृत्यु झाला. पोलीसांनी उत्तर तपासणी साठी त्याचा मृत्युदेह दवाखाण्यात दाखल केले असुन अधिक तपास सुरु आहे. त्यांचे पश्चात पत्नी व दोन मुले आहेत.मृत्युचे नेमके कारण कळू शकले नाही.