जळीत हत्याकांड परसेवाडा कुपोषित (भुकबळी) कारणाने दोघाचा मृत्यु ; प्रकरणाचे बिंग फुटले मृतकाच्या भावाकडून.
★ कुपोषिताच्या कुटुंबियांनी जादुटोणा करणाऱ्या पुजाऱ्यावर संशय घेऊन दोन पुजाऱ्यांना जिवंत जाळले.
★ एटापल्ली पोलीसांची कारवाई १६ आरोपींना पकडले.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
एटापल्ली : परसेवाडा येथील साडेतीन वर्षाची मुलगी निमोनिया व कुपोषीत बिमारीने होती असे अहेरी डॉक्टरचे म्हणणे होते.तिच्या वडीलांनी पहिले पुजारी नंतर ग्रामीण रुग्णालय एटापल्ली व अहेरी येथे भरती केले.परंतु नाईलाज झाला त्यांनी पुन्हा पुजाराना दाखविले व ति मृत्युमुखी पडली.
यापूर्वी यांच्याच नात्यातली गरोदर महिलेचा बाळ मरण पावला होता.या दोन कुटुंबात जादुटोणा करणारा पुजाऱ्यावर संशय व्यक्त करून गाव कमेटी बसवुन दोन्ही पुजाऱ्याना बोलविण्यात आले व त्यांना मारहान करून त्यांना परसेवाडा वरून १ कि.मी. अंतरावरील जंगलात दोन नाल्याच्या दरीत पुजाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकुन जिवंत जाळून टाकले अंगावर काटे आणणारा प्रकार सदर कार्य तेलामी कुटुंबियांच्या युवा पुरुषांनी केले.
एटापल्ली पोलीसांनी १६ संशयीत आरोपींना पकडून त्यांचेवर FIR दाखल केला.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संयोजक तथा पत्रकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र प्रदेशचे सदस्य रामभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात दि.हिन्दू या प्रशिद्ध वृत्तपत्राचे पत्रकार अतिश शेख मुंबई अधिकारी साहेब मुंबई तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संयोजक प्रा.मुनिश्वर बोरकर ' गोपाल रायपूरे चंद्रपूर आदिनी जिल्हा पोलीस अधिक्षक, निलोप्पल,जिल्हाधिकारी संजय दैने याची भेट घेऊन सदर टिम एस.डी.पि.ओ एटापल्ली यांचेकडून माहीती घेऊन पोलीस प्रोटेक्शनात परसेवाडा येथे पोहचली.
त्यात प्रत्यक्ष पाहणी करून गाव पाटिल लालु मडावी याचे घरी भेट घेऊन प्रकरणाची इतंभुत माहीती घेतली. प्रकरणाचे बिंग फुटले मृतकाच्या भावाकडून - सादु मासा मोहोदो ४६ रा. वालसामुंडी यांचा मुलगा गाव पंचायतीत हजर होता त्यालाही मारहान करण्यात आले होते.
मरणाच्या भितीने तो गावाकडे पळाला व वडीलांना हकीगत सांगीतल्या नंतर वडील सादु मासा मोहोदो ४७ वालसामुंडी हा परसेवाडा पोहचला व बहिणीच्या बाबतची माहिती कळताच त्यांनी एटापल्ली पोलीस स्टेशनला २ मे ला रिपोर्ट दर्ज करताच पोलीसांचे चक्र त्या गतीने फिरले व तब्बल १६ आरोपीना अटक करून कलम 302,307,201,143,149 IPC अमानुष कृत्य बळी म्हणुन गुन्हा दाखल केला.
फियार्दी सादु यांच्यामुळे सदर घटना उजेळात आली अन्यता गावकरी सांगायला तयार नव्हते . बेरजा तेलामी चा पती म्हणत होता की बेरजाचा गावकऱ्यांना त्रासच होता बरे झाले.आता गावात शांतता पसरली आहे परंतु अमानुष हत्या करणारे १६ आरोपीचे कुटुंब उघड्यावर पडले.