डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्या प्रकरणी आमदार,जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध पुणे येथे गुन्हा दाखल.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्या प्रकरणी आमदार,जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध पुणे येथे गुन्हा दाखल.


एस.के.24 तास


पुणे : महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.


याबाबत भीमराव बबन साठे वय,48 वर्ष रा.कोंढवा यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साठे हे भारतीय जनता पक्षाच्या पुणे शहर अनुसुचित जाती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. शैक्षणिक अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील दोन श्लोकांचा समावेश करण्याच्या प्रकरणामुळे राजकीय वतुर्ळात उलट सुलट चर्चा सुरू आहे. त्यानिषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाडमधील चवदार तळ्याच्या परिसरात बुधवारी आंदोलन केले.


आंदोलन करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यानंतर आव्हाड यांच्यावर टीका झाली. अनावधानाने झालेल्या या घटनेबाबत आव्हाड यांना माफी मागितली आहे. अशा प्रकारे वर्तन करुन आव्हाड यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम केले, आहे. आव्हाड यांच्या कृत्यामुळे देशभरातील आंबेडकरी चळवळीतील अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत,असे साठे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


आव्हाड यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३, १५३ (अ), २९५(अ), ५०४, ५०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांकडून याप्रकरणाचा तपास करण्यात येत आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !