पाथरी येथे आर्थिक मदत विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनचा उपक्रम.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१५ मे २०२४ राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार साहेब यांच्या जनसेवा हिच ईश्वर सेवा या सेवाभावी विचारधारेच्या माध्यमातून त्यांच्या विजयकिरण फाउंडेशन तर्फे दरवर्षी शेकडो गोर- गरीब जनता,अपघाती रुग्ण,कॅन्सरग्रस्त तसेच दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत करण्यात येते याचाच प्रत्यय आज मौजा.पाथरी येथे पाहण्यात आला.
तालुक्यातील मौजा.पाथरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे कुष्टरोगाने ग्रस्त असलेल्या रुग्णाला सावली तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष मा.राजूभाऊ सिद्धम व तालुकाध्यक्ष मा.नितीनभाऊ गोहने यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
श्री.संदीप सखाराम गेडाम वय,२८ वर्षे यांना मागील काही दिवसापासून आपल्या शरीरात विविध बदल होताना दिसत होते,जखम झालेल्या जागेवर लाल चट्टे येऊन दुखापत होत नव्हती,उपचारा दरम्यान डॉक्टरांनी त्यांना कुष्टरोग असल्याचे सांगितले, गेडाम कुटुंबातील प्रमुख व्यक्ती आजाराने ग्रस्त असल्याने उपचारासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती, उदर्निवाहासाठी दुसरे कोणतेही व्यवसाय अथवा शेती नसल्याने आर्थिक मदत देण्यात आली.
संदीप गेडाम हे गरीब कुटुंबातील असून भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, कुटुंबावर आर्थिक संकट आल्याने त्यांना आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना पाथरी शहर काँग्रेस अध्यक्ष मा.मोहित मेश्राम,ग्राम काँग्रेस कमिटी करगाव अध्यक्ष, मा.चुडीराम कोलते, युवा पदाधिकारी मा.सचिन शेंडे,मा.शरीफ पठाण,मा.लक्ष्मण नैताम,मा.मधुकर चचाने,मा.हितेश कुंभारे,सोशल मीडिया प्रमुख पाथरी शहर मा.रोशन ठीकरे आदी उपस्थित होते.