★ ड्रीम संस्था व संदेश गडचिरोली संस्थेचा संयुक्त संकल्प ; प्रत्येकांच्या घरी पिण्यासाठी शुद्ध पाणी.
एस.के.24 तास
गडचिरोली : दुर्गम व ग्रामीण भागात पिण्याचे पाण्यासंदर्भात अनेक समस्या लक्षात घेऊन नागरिकांचे आरोग्याची काळजी घेत ड्रीम बहुद्देशीय संस्था तिवसा जि.अमरावती व सोशल एक्शन फार न्याशनल डेव्हलपमेंट इन एज्युकेशन सोसायटी ऑफ ह्युमन (संदेश) गडचिरोली च्या संयुक्त विद्यमाने येवली,रामपूरी, गोविंदपूर गावांत मोफत केंट वॉटर प्युरीफायर वाटप करण्यात आले.
दुर्गम भागातील विहीरी व हातपंपातील पाण्यात मोठ्या प्रमाणात क्षार असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना मूत्रपिंडाचे,पोटाचे आजार होत असतात.एवढंच नाही तर पावसाळ्यात बालकांना अतिसार,हगवण -उलट्या सारखे आजार होतात परिणामी शुद्ध पिण्याच्या पाण्याच्या अभावामुळे समस्या लक्षात घेत संदेश चे संचालक डॉ.गुरुदास सेमस्कर यांनी सर्वांना माहिती समजावून सांगितले.
सदर केंट वाटर प्युरिफायर येवली ग्रामपंचायत येथील प्रत्येक कुटुंबाला वाटप करण्यात आले आणि याचा महत्व,उपयोग सांगून प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.
सदर केंट वाटप करतांना संदेश संस्था गडचिरोली चे संचालक डॉ.गुरुदास सेमस्कर,युवराज भांडेकर सरपंच,चोखाजी बांबोळे,सामाजिक कार्यकर्ते,शिवकुमार सेमस्कर,बंडू खोब्रागडे, किरणताई उंचावणे ग्रा.पं.सदस्य,सुरेश कन्नमवार मुख्य संपादक,एस.के.24 तास यांच्या प्रमुख उपस्थितीत वाटप केले.
सदर गावांमध्ये वॉटर प्युरिफायर वाटताना संदेश चे हेमंत चापले,श्रिकांत भांडेकर,मनोहर चचाने,नुरखा पठाण,जयंत चांदेकर यांनी अथक परिश्रम घेतले आहे.