अहेरी तालुक्यातील चेरपल्ली येथील महिलेवर तेंदूपत्ता संकलन करताना रानडुकराचा हल्ला.
एस.के.24 तास
अहेरी : अहेरी तालुक्यातील जवळील चेरपल्ली येथील एका महिलेवर तेंदूपत्ता संकलनाचे काम करीत असताना रानडुकराने हल्ला करून जखमी केले आहे.
सौ,अंजली राजेश्वर रामटेके हे दिनांक,11 मे रोजी सकाळी तेंदुपत्ता संकलनासाठी जंगलात गेली असता त्यांच्यावर रान डूकराने हल्ला केल्याची घटना घडली आहे.त्यामधे ती गंभीर जखमी झाली आहे सदर घटना आज दि,11 मे ला सकाळी सुमारे 8.30 ते 9 वाजता च्या दरम्यान घडल्याची माहिती प्राप्त झाली असून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
सध्या अहेरी तालुक्यातील खेळेगावांमध्ये तेंदुपत्ता तोडण्याचा सिजन सुरू झाला असून सामान्यांपासून ते गोर गरीब परिवारातील नागरिक या कामासाठी पहाटेला जंगलात जात असतात मात्र त्यांना जंगली जनावरांचा सामना करावा लागेल याची कल्पना नसते त्यामुळे असे गंभीर अपघात होत असतात.त्यामुळे नागरिकांनी तेंदुपत्ता तोडण्यासाठी जातांना सावधान असणे आवश्यक आहे. जेणेकरून जंगली जनावरांच्या हल्ल्यापासून बचावता येईल.