आरमोरी बर्डी येथे दोघांनी एकाच दोरीने गळ्याला लावला फास प्रियकराचा मृत्यू तर प्रेयसी बचावली.
एस.के.24 तास
आरमोरी : भेटण्यासाठी ओळखीच्या महिले च्या घरी अल्पवयीन मुलगी व तिचा प्रियकर आले. दोघांनी गप्पा मारल्या.मित्रा कडून हॉटेल मधून मागवलेली बिर्याणी खाल्ली व त्यानंतर दोघांनीही एकाच दोरीने गळ्याला फास लावला.
यात प्रियकराचा जागीच मृत्यू झाला तर प्रेयसी थोडक्यात बचावली.ही खळबळजनक घटना शहरातील बर्डी परिसरात काल १६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. या घटने मागील कारण अस्पष्ट आहे.
माहितीनुसार,राहुल गजानन सावसागडे वय,20 वर्ष रा.शिवाजी चौक जवळ,आरमोरी असे मयताचे नाव आहे.
तो ट्रॅक्टवर मजुरी काम करायचा.त्याचे शहरातीलच एका अल्पवयीन मुलीशी प्रेम संबंध होते.बर्डी परिसरातील एका महिले च्या घरी दुपारी 3 : 00.वा ते भेटण्यासाठी एकत्रित आले.
गप्पा मारल्या नंतर 4 :30 वा. राहुलने मित्रा कडून हॉटेल मधून बिर्याणी मागवली.दोघांनी बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांनीही त्याच खोलीत स्लॅब च्या लोखंडी हुकला नायलॉन दोरी बांधून गळफास घेतला.यात राहुल सावसागडे याचा मृत्यू झाला.
तर प्रेयसी बचावली.दरम्यान तिला तातडीने ब्रम्हपुरी येथे हलविण्यात आले असून सध्या उपचार सुरु आहेत.
राहुलचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.आकस्मिक मृत्यूची नोंद असून या घटने मागील कारण शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
फोन न उचलल्याने मित्रांना संशय : -
राहुल सावसागडे हा प्रेयसी सोबत असल्याची माहिती मित्रांना होती.5: 30 वा.मित्रांनी त्यास फोन केला असता त्याने कॉल घेतले नाहीत. त्यामुळे त्यांना संशय आला व त्यांनी बर्डी येथील महिले च्या घरी जाऊन पाहिले असता हा प्रकार समोर आला.
मुलाला खोली कशी काय दिली ?
आरमोरीत अल्पवयीन मुलींवर अत्याचाराची प्रकरणे वाढल्याचे चित्र आहे.एका अल्पवयीन मुलीला तर वेश्या व्यवसाय च्या दलदलीत लोटण्याचा प्रयत्न एका महिलेनेच केल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आलेला आहे.
या घटनेत अल्पवयीन मुलीसह तरुण प्रियकराला ओळखीतील महिलेने खोली उपलब्ध करुन दिल्याचे समोर येत आहे. खोली उपलब्ध करुन कशी दिली, या दृष्टीने आता पोलिसांनी तपास सुरु केल्याचे सूत्रांनी सांगितले.