सोनापुर येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त ध्वजारोहण खिरदान वाटप.

सोनापुर येथे बुद्ध पौर्णिमा निमित्त ध्वजारोहण खिरदान वाटप.


सुदर्शन गोवर्धन - प्रतिनिधी


सावली : तथागत भगवान गौतम बुद्धांचा जन्म बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही महत्त्वपूर्ण घटना एकाच दिवशी वैशाख पौर्णिमेला घडल्या.त्यामूळे या त्रिवार पवित्र दिवसानिमित्त सावली तालुक्यातील सोनापुर गावात बौध्द समाज व रमाई महिला मंडळ यांच्या वतीने सम्राट अशोक बुद्ध विहार येथे सकाळी आठ वाजता बुद्ध वंदना व ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात भ.गौतम बुद्ध आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर बुद्धवंदना घेण्यात आली. आणि  ध्वजारोहण बौध्द समाजाचे अध्यक्ष लालाजी बोरकर यांचे हस्ते करण्यात आले.


कार्यक्रमाला बौध्द समाजाचे सचिव,अविनाश रामटेके,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास बांबोळे,यादव बोरकर,कैलास बांबोळे माजी अध्यक्ष त.मु.स,नरेंद्र गोवर्धन,पांडुरंग बांबोळे माजी उपसरपंच ग्रा.प.सोनापुर,पुरुषोत्तम बांबोळे  माजी अध्यक्ष बौध्द समाज, बंडू बारसागडे सदस्य ग्रा.पं.स, मदन बाबोळे, निर्णय बांबोळे, तलाश गोवर्धन,प्रीतम बांबोळे, बंडू का.गोवर्धन, नरेश बांबोळे, कृष्णा बोरकर, विपुल बांबोळे, बाबुराव वाकडे, दीपक रो बांबोळे,उमेश मेश्राम ,दीपक अ बांबोळे,अदिभ गोवर्धन संदेश बांबोळे,तसेच रमाई महिला मंडळच्या सर्व पदाधिकारी आणि बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !