देवदा पुलाचे काम संथ गतीने सुरजागड पाईप लाईनने रस्त्याची खराबी.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
चामोर्शी : रेगडी ते एटापल्ली रोड वरील देवदा च्या नदी वर पुलाचे काम कासव गतीने सुरु असून पावसाळ्या पूर्वी पुलीयाचे काम पुर्ण होणे शक्य दिसत नाही.रेगडी - देवदा ते एटापल्ली मार्ग सुकर व जवळ व्हावा म्हणुन शासनाने कोट्यावधीचा पुलीया चे बांधकाम चामोर्शी येथील कर्तव्यदक्ष कॉन्ट्रॅक्टर वायलवार यांना दिले आहे.
संबंधित ठेकेदारा कडून पुल बांधण्याचे काम काम कासव गतीने सुरु असुन जुन महिन्या पर्यंत सुरु राहणार आहे. त्यामुळे सदर भागातील वाहतुक करणारे गावकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे.याच देवदा नदिवर विहीर बांधुन देवदा ते सुरजागड पहाडी पर्यंत पाईप लाईनचे काम सुरू असुन यात गावातील रस्ते खराब होत असताना दिसत आहेत.
सदर पुलाचे काम लवकरात लवकर करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.