मोहटोला येथे रिपाईची बैठक संपन्न.

मोहटोला येथे रिपाईची बैठक संपन्न

 

मुनिश्वर बोरकर - गडचिरोली


आरमोरी : रिपब्लिकन पार्टी तालुका शाखा आरमोरी येथील मोह टोला येथे रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर व कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.


सदर सर्कलमधे पक्षाचे कार्य जोमाने करावे तरच आपल्या अडीअडचणी साठी पक्षाचे जेष्ठ नेते सहकार्य करू शकतील.निवडणुका हा आमच्या पक्षाचा मुख्य विषय नाही.समाज कार्य करणे रिपाईचे कार्य आहे असे प्रा.मुनिश्वर बोरकर यांनी सांगीतले.या प्रसंगी पिरिपाचे कार्याध्यक्ष मुरलीधर भानारकर यांनीही मार्गदर्शन केले.


सदर बैठकीला पांडुरंग सावकार ढेभुर्णे , गिरिधर शेन्डे ' देवेंद्र बोदेले , गोपाल ढेभुर्णे, दामोधर ढेभुर्णे,विलास चौधरी ,ढेभुर्ण पाटिल आदि सहीत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !