मानव विकास अंतर्गत वैनगंगा विद्यालय कोलारी येथे विद्यार्थीनीना सायकल वितरण.
अमरदीप - लोखंडे सहसंपादक
ब्रम्हपुरी : दिनांक,०१/०५/२०२४ रोज बुधवारला वैनगंगा विद्यालय कोलारी येथे महाराष्ट्र दिन तथा कामगार दिनाच अवचित्त साधून मानव विकास अंतर्गत सायकल वितरीत करण्यात आल्या. या कार्यक्रमा प्रसंगी महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ.देविदास जगनाडे सर व संस्थेचे सचिव प्रा. दिलीप जगनाडे व अक्षय जगनाडे तथा शाळेचे मुख्याध्यापक श्री.धनंजय दाते सर तथा शिक्षक वृंद कु. कल्पना कोल्हे मॅडम व
श्री. योगेश नागपुरे सर कु. प्रधान म्याडम व इतर शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमात एकूण ३१ सायकली विद्यार्थिनींना वाटप करण्यात आल्या. या प्रसंगी प्रास्ताविक भाषणात शाळेचे मुख्याध्यापक श्री. धनंजय दाते सरांनी मानव विकास अंतर्गत प्राप्त सायकलीमुळे गरीब होतकरू मुलीना शिक्षणाची आवळ निर्माण होईल व ते शिक्षणाच्या प्रवाहात येईल असे सांगितले.
तर संस्थेचे सचिव प्रा. दिलीप जगनाडे यांनी आपल्या भाषणात शालेय जीवनातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत झालेला बदल व त्यावरील उपाय यावर चर्चा केली तर संस्था अध्यक्ष डॉ. देविदास जगनाडे सरांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून मार्गदर्शन करीत सायकीलीचे विद्यार्थी जीवनात किती महत्व आहे व आपली शाळा शासनाच्या प्रत्येक लाभाचा फायदा घेऊन तो लाभ विद्यार्थ्या पर्यंत पोहोचवतात असे त्यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणात सांगितले.
अश्याप्रकारे हा कार्यक्रमाचे संचालन कु. कोल्हे म्याडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. योगेश नागपुरे सर यांनी केले.