विकास विद्यालय अ-हेरनवरगाव चे चमकलेले तीन तारे.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक.
ब्रह्मपुरी : दिनांक,२८/०५/२४ नुकत्याच जाहीर झालेल्या नागपूर बोर्डाच्या इयत्ता दहावीच्या निकालात विकास विद्यालय, अ-हेरनवरगाव येथील विद्यार्थी प्रज्वल प्रकाश खोब्रागडे 78.80% समीक्षा रवींद्र नागतोडे 78.40% आत्मज्ञान रूपचंद दिघोरे व प्रकाश शेषराव धोटे 77% या तीन विद्यार्थ्यांनी आपल्या बुद्धीचे कौशल्य पणाला लावून विद्यालयातून प्राविण्य प्राप्त करून बहुमान मिळविला.
सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेल्या , घर व शेतीचे काम आटोपून,नियमित शाळेत जाऊन,शिक्षकांनी सांगितलेला अभ्यासक्रम पूर्ण करून त्यांनी दिलेल्या सूचनांचे व मार्गदर्शनाचा पुरेपूर लाभ घेऊन,या तिन्ही भूक तहान विसरून अभ्यासाने अथक परिश्रम घेऊन मनात असलेली शिकण्याची जिद्द व धडपड त्यांच्या या गुणवत्तेला बळ देऊन गेली.
त्यांनी मिळविलेल्या या यशामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव व त्यांचे कौतुक केल्या जात आहे.