नागभीड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानपा जवळ कंटनेरची ट्रॅव्हल्स ला धडक.
★ २ दोघे गंभीर जखमींवर नागपूर तर १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
नागभीड : भरधाव कंटेनरने ट्रॅव्हल्सला धडक दिल्याने १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ८:३० वाजेच्या दरम्यान नागभीड - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील कानपाजवळ झाला.यात दोनही वाहनचालक गंभीर जखमी झाल्याने नागपूरला हलविण्यात आले,तर उर्वरित १० जखमींवर नागभीड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नागभीड-नागपूर राष्ट्रीय महामार्गाने ट्रॅव्हल्स बस (क्रमांक एम.एच.४० बीजी- ६८१८) नागभीडकडून नागपूरकडे जात होती. दरम्यान, विरुद्ध दिशेने येणाऱ्या कंटेनरने (क्रमांक एम.एच.४० सीडी ९६५६ कानपा जवळ साहेब नाल्यावर ट्रॅव्हल्सला जबर धडक दिली.
या धडकेत ट्रॅव्हल्समधील १० प्रवासी जखमी झाले. कंटेनरचालक अनितकुमार पटेल वय,२९ वर्ष मध्य प्रदेश) व विजय राऊत वय,४६ वर्ष टॅव्हल्स चालक,रा.मूल) हे दोघे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूरला हलविण्यात आले.
गीता कायरकर वय,५४वर्ष मेंडकी,आशा चिलबुले वय,३८ वर्ष,सचिन चिलबुले वय,४३ वर्ष, साची चिलबुले वय,१४ वर्ष,ताराबाई जांभुळे वय,६०वर्ष, धर्मदास राकडे वय,७० वर्ष,ज्योती चिलबुले वय,५१ वर्ष शोभा चिलबुले वय,४० वर्ष सर्व नागभीड,
लीला कामडी वय,६० वर्ष नवरगाव,रघुनाथ जिभकाटे वय,७२ वर्ष, ब्रह्मपुरी आदींवर नागभीड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली.