नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ साजरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : दिनांक,२५/०५/२४ ब्रम्हपुरी शहरातील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्था, ब्रम्हपुरी द्वारा संचालित नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
एच.एस. सी.(12 वी) मार्च 2024 परीक्षेच्या निकालात महाविद्यालयाने आपला उत्कृष्ट निकाल लावून यशाची परंपरा कायम ठेवली. महाविद्यालयाचा एकूण निकाल 97.99% लागला. विज्ञान शाखेतिल कु ज्ञानेश्वरी सुभाष उरकुडे हिला 92.17% गुण प्राप्त होऊन महाविद्यालयात प्रथम आलेली आहे. रजत शंकर कामड़ी 87.33% द्वितीय तर कु सिद्धि रामदास नाकतोडे हिने 86.17% तृतीय क्रमांक पटकाविलेला आहे.
वाणिज्य शाखेतील प्रथम येण्याचा मान कु रितु घनश्याम शिउरकर 91.00% हीने मिळविलेला आहे. तर द्वितीय कु साक्षी अशोक ढोरे 90.83% हिने तर तृतीय क्रमांक कु मोहिनी गुरुदेव नवघड़े 89.33% हीने पटकाविलेले आहे.
कला शाखेतील प्रियशील तुळशीराम चंदनखेड़े प्रथम 85.17%, महेश पुंडलिक भोयर द्वितीय 83.83% तर कु पूनम ईश्वर ढोरे 81.83% ही तृतीय आलेली आहे.
महाविद्यालयातर्फे सर्व गुणवंत आणि विशेष प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ ने. हि. शिक्षण संस्थेचे सचिव आदरणीय श्री अशोकजी भैया, ने. हि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.डी.एच. गहाणे,डॉ. सुभाष शेकोकर ,पर्यवेक्षक प्रा. आनंद भोयर,प्रा विनोद नरड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाकरिता समस्त प्राध्यापक वर्ग आणि शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते. सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन प्रा ओजस्विनी बावनकुळे यांनी केले आणि आभार प्रा. कृतिका बोरकर यांनी मानले.