ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे सचिव,अशोक भैयांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम.

ने.भै.हि.शिक्षण संस्थेचे सचिव,अशोक भैयांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप कार्यक्रम.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी : ४/५/२४ येथील नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सक्रिय सचिव तथा ब्रम्हपुरी शहराचे प्रथम नगराध्यक्ष अशोकजी भैया यांच्या  वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम ग्रामीण रुग्णालय,ब्रम्हपुरी येथे घेण्यात आला.




यानंतर कर्मयोगी मदनगोपालजी भैया छात्रावास,स्व.शांताबाई भैया मुलींचे वसतिगृहात प्राचार्य डॉ डी एच गहाणे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, संचालक प्रा विनोद नरड,पर्यवेक्षक प्रा आनंद भोयर व समस्त प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करुन वसतिगृहातील विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !