नाट्य श्री साहित्य कला मंच गडचिरोली च्या वतीने महानाट्य पुस्तक प्रकाशन सोहळा व कवी संमेलना चे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,१८/०५/२४ नाट्य श्री साहित्य कला मंच, गडचिरोली च्या वतीने झाडीपट्टीतील नाटककार श्री.उदाराम बल्लारपुरे लिखित व मधु श्री पुणे द्वारा प्रकाशित महापूजा अर्थात महासती सावित्री या महानाट्य पुस्तकाचे प्रकाशन व लोकार्पण सोहळा तसेच निवडक कवीं चे कवी संमेलन दिनांक २६/०५/२४ रोज रविवारला सकाळी ११-०० वाजता केमिस्ट भवन चामोर्शी रोड, गडचिरोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
सदर महानाट्य पुस्तक प्रकाशन सन्मा . डॉ. प्राचार्य श्याम मोहरकर प्रसिद्ध साहित्यीक, रंग कर्ता तथा समीक्षक, चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली सन्माननीय डॉ बळवंत भोयर प्रसिद्ध साहित्यिक रंग कर्ता तथा समीक्षक, नागपूर यांचे शुभ हस्ते आणि माननीय डॉ प्राध्या.विशाखा संजय कांबळे प्रसिद्ध साहित्यिक रंग कर्ता तथा समीक्षक, नागपूर,डॉ.प्राध्या.जनबंधू मेश्राम सिंदेवाही ,डॉ.प्राध्या योगीराज नगराळे तळोदी आणि नागोराव सोनकुसरे प्रसिद्ध कवी नागपूर यांच्या विशेष उपस्थितीत होणार असुन महानाट्य पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर निवडक निमंत्रित कवींचे कवी संमेलन होणार आहे.
तरी सदर कार्यक्रमाला जास्तीत जास्त नाट्य रसिक आणि कविता प्रेमी बंधू भगिनी यांनी उपस्थित रहावे अशी आयोजक समिती नाट्य श्री,साहित्य कलामंच गडचिरोली यांनी आवाहन केले आहे.