जेष्ठ रिपाई नेते मारोतराव कांबळे यांचा वाढदिवस साजरा.

जेष्ठ रिपाई नेते मारोतराव कांबळे यांचा वाढदिवस साजरा.


अमरदीप लोखंडे, सहसंपादक.


ब्रम्हपुरी : ८/५/२४ महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहवासातील प्रत्यक्ष साक्षीदार तसेच बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या  मार्गदर्शनाखाली पूर्व विदर्भात  शिक्षणाचे दालन खुले करणारे  शिक्षण महर्षी  रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव,मारोतराव कांबळे यांच्या ८९ वा वाढदिवस संस्थेतील कर्मचारी यांच्या वतीने साजरा करण्यात आला.


डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिक्षण संस्था चांदा द्वारा संचालित डॉ बाबासाहेब आंबेडकर कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, डॉ.आंबेडकर विद्यालय,ब्रम्हपुरी पब्लिक स्कूल,मीराबाई कांबळे नर्सिंग कॉलेज, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बी. एड.शिक्षण महाविद्यालय,डॉ बाबासाहेब आंबेडकर डी फॉर्म महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे अध्यक्ष मारोतराव कांबळे यांचा वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला.या वेळेस प्राचार्य डॉ.देवेश कांबळे, मुख्याध्यापक चाचरकर,प्राचार्य डॉ,राजेश कांबळे,प्राचार्या रीमा कांबळे


प्रा.डॉ.स्निग्धा कांबळे,प्राचार्य प्रा. रंगारी ,प्राचार्य सुषमा गजभिये, प्राचार्य , प्राचार्या सुविधा बागडे, पर्यवेक्षक उके तसेच संस्थेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.त्याच बरोबर पत्रकार संघ,रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते,विविध राजकीय पक्षांचे नेते तथा विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मारोतराव कांबळे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !