विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे चारगाव येथे आर्थिक मदत.

विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे चारगाव येथे आर्थिक मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,१७ मे २०२४ तालुक्यातील मौजा. चारगाव येथे कॅन्सरग्रस्त रुग्णाच्या कुटुंबियाना राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने काँग्रेस कार्यकर्ता मा.श्रीकांत बहिरवार  यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.


सविस्तर वृत्त असे की,मौजा.चारगाव येथील श्री.श्रावण गावतुरे वय ५० वर्षे हे भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, वारंवार तबेत खराब असल्याने ते दवाखान्यात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना कॅन्सर असल्याचे सांगितले,घरातील प्रमुख व्यक्तीवर अशी वेळ आल्याने कुटुंबावर आर्थिक संकटाची बाजू आली.



त्यांना पुढील उपचारासाठी आर्थिक मदतीची गरज असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.


आर्थिक मदत देताना बोथलीचे उपसरपंच मा.नरेश पाटील गड्डमवार,चारगावचे उपसरपंच मा.राजेश्वर वलके, मा.डॉ.घाटे,युवा कार्यकर्ता मा.सनदकुमार बोरकर,मा.माणिकचंद खोब्रागडे,मा.रवी डोंगरे,आदी उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !