तीन अपघातात ४ दुचाकी स्वारांचा मृत्यू.

तीन अपघातात ४ दुचाकी स्वारांचा मृत्यू.


एस.के.24 तास


मुंबई अहमदाबाद महामार्गावर रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी वाहनचालकांच्या जीवावर बेतू लागली आहे. गुरुवारी एकाच दिवसात झालेल्या दुचाकींच्या तीन वेगवेगगळ्या अपघातांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे.


मुंबई अहमदाबाद महामार्गावर मागील तीन महिन्यांपासून सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. त्यातच आता घोडबंदर -गायमुख येथील रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अधिक बिकट झाली आहे.


याचा फटका वाहनचालकांना बसू लागला आहे. गुरुवारी दिवसभरात महामार्गावर दुचाकीस्वारांचे तीन वेगवेगळ्या अपघाताच्या घटना घडल्या. त्यात एका महिलेसह ४ जणांचा मृत्यू झाला.


पहिली घटना गुरुवारी पहाटे दोनच्या सुमारास घडली.या दुर्घटनेत वसईहून ठाण्याच्या दिशेने जाणारे अबू शेख वय,20 वर्ष आणि जुनेद मोईन वय,21 वर्ष या दोघांचा ससूनवघर येथे अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. दुसरी घटना दुपारी 12 वा. च्या सुमारास महामार्गावरील नायगाव येथे घडली. 


यावेळी एका ट्रकन ने सुदिराम विश्वास वय,51 वर्ष या दुचाकीस्वाराला घडक दिल्याने मृत्यू झाला. तिसरी घटना न्यू फाऊंटन हॉटेलजवळ दुपारी अडीचच्या सुमारास घडली.


 यावेळी दुचाकीने जात असलेल्या उषादेवी यादव वय,55 वर्ष एका ट्रकने दिलेल्या अपघातात मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. वाहतूक कोंडी, रस्त्याचे सुरू असलेले काम, दिशादर्शक फलक आणि दुभाजक नसणे यामुळे हे अपघात होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.


#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !