महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून केले ठार. ★ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील बामणी (माल) येथील घटना.

महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून केले ठार.


★ सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील बामणी (माल) येथील घटना.


राजेंद्र वाढई - उपसंपादक


सिंदेवाही : सिंदेवाही तालुक्यातील शिवनी वनपरिक्षेत्रातील पेटगावव - खातेरा बीटात कक्ष क्रमांक ३२२ मध्ये बामणी (माल) येथील दीपा दिलीप गेडाम वय,३५ वर्ष ही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेली असता दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केले.ही घटना शनिवार ४ मे 2024 रोजी सकाळी उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच सिंदेवाही चे ठाणेदार तुषार चव्हाण,वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.यावेळी झुडपात दीपा हिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता. यावेळी शिवणीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विदेशकुमार गलगट, क्षेत्र सहाय्यक एस .वाय .बुले, क्षेत्र सहाय्यक पेंदोर, वनरक्षक मडावी घटनास्थळी हजर होते. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केल्यानंतर तत्काळ आर्थिक मदत तातडीची मदत म्हणून 50,000/-रुपये मृतक च्या पती ला दिले.देऊन मृतदेह कुटुंबाकडे सोपविण्यात आला.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !