विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे बोथली येथील कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : दिनांक,१३ मे २०२४ तालुक्यातील मौजा.बोथली येथे राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना सावली तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मा.नितीन गोहने व ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष मा.विजय गड्डमवार व सरपंच मा.सुशील नरेड्डीवार यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सौ.शिलबाई राजाभाऊ वाळके वय,५३ वर्षे व सौ.लताबाई प्रकाश मामीडवार वय,५५ वर्षे ह्या दोन्ही रुग्ण गरीब कुटुंबातील असून भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, मागील काही दिवसापासून ते उपचार घेत होते परंतु वारंवार तबेत बिघडत चालल्याने पुढील उपचार घेत असताना या दोन्ही रुग्णांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना मा.अनिल मुप्पावार,मा.वीरेंद्र गड्डमवार,मा.चोखाजी वाळके,मा.भारत मराठे,मा.शेखर प्यारमवार,मा.विलास वाळके,मा.विशाल मुस्कावार आदी उपस्थित होते.