गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले.

गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात जादूटोण्याच्या संशयातून महिलेसह दोघांना जिवंत जाळले.


एस.के.24 तास


एटापल्ली : १ मे रोजी राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिन साजरा केला जात असताना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिले सह दोन जणांना काही गावकऱ्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

जमनी तेलामी वय,५२वर्ष,देऊ आतलामी वय,६०वर्ष अशी मृतांची नावे असून या प्रकरणी १५ जणांना अटक करण्यात आली आहे.एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथील जमनी आणि देऊ हे दोघे जादूटोणा करीत असल्याचा संशय काही गावकऱ्यांना होता. 


१ मे रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली.त्यानंतर मरणासन्न अस्वथेत असलेल्या दोघांना ओढत नेत रात्री १० वाजता दरम्यान गावा बाहेरील नाल्यात पेटवून दिले.दुसऱ्या दिवशी उशीरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती.


दरम्यान, पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून गुन्ह्याचा उलगडा केला.घटनास्थळी दोघांच्या मृतादेहांचा कोळसा झाला होता.या प्रकरणी गावातील एकूण १५ जणांना अटक करण्यात आली असून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.आरोपींमध्ये मृत जमनी हीचा नवरा देवाजी तेलामी वय,६०वर्ष व मुलगा दिवाकर तेलामी वय,२८वर्ष यांचा समावेश आहे.


गुन्ह्याला दोन वर्षां पूर्वीच्या घटनेची किनार : - 

जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागात आज ही जादूटोणा सारखे प्रकार समोर येत असतात.दोन वर्षां पूर्वी एटापल्ली तालुक्यातील बार्सेवाडा येथे एका मुलाचा आकस्मिक मृत्यू झाला होता.तेव्हापासून काही गावाकऱ्यांना जमनी आणि देऊ यांच्यावर जादूटोण्याचा संशय होता.त्यामुळे या हत्याकांडाला " त्या " घटनेची किनार असल्याची चर्चा गावात आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !