कोंडेखल येथे वनविभागाने अतिक्रमण जागेवर चालविले बुलडोजर ; तालुक्यातील अतिक्रमण वनविभाग हटवेल का ?
★ पिढीत अतिक्रमणधारकांचा सवाल.
एस.के.24 तास
सावली - वनपरीक्षेत्र सावली हद्दीतील कोंडेखल येथील वनविभागाच्या जागेवर वर्षानुवर्षे अतिक्रमण करून कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पिक घेणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रण बुलडोजर लावून हटविले.
यामुळे फक्त कोंडेखल येथील च अतिक्रमण वनविभागाला दिसले का ? इतर गावातील अतिक्रमण का हटवीत नाही ? असा सवाल करीत आहेत.
वनविभागातील जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांना वनहक्क अधिकार कायदा 2006 नुसार पट्टे देण्याची कार्यवाही सुरु आहे.अनुसूचित जमातीच्या कुटुंबांना 2005 पूर्वीचे अतिक्रमण असेल तर पट्टे देण्यात येते.
मात्र इतर जातींना तीन पिढ्यांचा रहिवासी द्यावा लागत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पट्टे मोजके देण्यात आले.मात्र कोणत्याही अतिक्रमण धारकांवर अतिक्रमण काढण्याची कारवाई होत नसतांना कोंडेखल येथे अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली.धान पिकासाठी तयार केलेले पाळे उध्वस्त करण्यात आले.
नियमानुसार ज्या ज्या ठिकाणी वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण आहे ती सर्व जागा वनविभागाने ताब्यात घ्यायला पाहिजे परंतु कोंडेखल परिसरातील हजारो हेक्टर वर अतिक्रमण असतांना फक्त कोंडेखल येथील च अतिक्रमण हटविण्यात का आले ? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
वनसंरक्षण समिती,ग्रामपंचायत यांनी अतिक्रमण हटविण्याची मागणी केल्याने कोंडेखल येथील वनविभागाच्या जागेवरील अतिक्रमण हटविले. - विनोद धुर्वे,वनपरीक्षेत्र अधिकारी सावली
वन समिती ने आम्हाला पत्र पाठविले की आम्हाला ग्रामसभा घ्यायची आहे म्हणून काहिक लोकांनी मुजोरी केली.आणि मुजोरी ने अतिक्रमण वाढविले त्याज्या मूळ वन समिती अध्यक्ष नी निर्णय घेतले की कोंडेखल मध्ये अतिक्रमण वाढत चालला काहिक लोकांनी त्यांच्या मागे लागेल की अतिक्रमण वाढत चालला त्याच्या मागे लागले की पैसे खाल्ले तुम्ही ग्रामपंचायत ला पत्र दिले.नोटीस चिपकवून ग्रामसभा लावली.अतिक्रमण हटवण्याबद्दल 40 ते 50 लोकांचा आहे. - नरेश बाबनवाडे,उपसरपंच ग्रा.पं.कोंडेखल