राहुल गांधी यांनी पी.एन.पाटील यांच्या विषयी व्यक्त केल्या शोक भावना ; जनतेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला.
एस.के.24 तास
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष,आमदार पी.एन.पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांत्वनपत्र पाठवले आहे.
पी.एन.पाटील यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्यासारखा जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारा नेता काँग्रेस परिवाराने गमावला आहे. उपेक्षितांचे जीवन बदलण्याचा निर्धार त्यांच्या राजकारणाला दिशा देणारा ठरला आहे.अशा भावना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या सांत्वनपत्रातून भावना व्यक्त केल्या आहेत.
सांत्वन पत्रामध्ये म्हटले आहे कि, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या काँग्रेस विचारधारेशी असलेल्या तीव्र बांधिलकीने त्यांच्या राजकारणाला आकार दिला. समाजात शांतता आणि सहिष्णुतेचा आदर्श साजरा करण्यासाठी त्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ सद्भावना दौडचे आयोजन केले.
पक्षासाठी विशेषत : कोल्हापुरातील संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान स्मरणात राहील.मी तुझ्या दु:खाची कल्पना करू शकतो.माझ्या मन:पूर्वक संवेदना स्वीकारा,असे गांधी यांनी अशोक संदेशांमध्ये म्हटले आहे.