उपजिल्हा रूग्णालय वरोरा येथे जागतिक डेंग्यू डे साजरा.
एस.के.24 तास
वरोरा : उपजिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर येथे जागतिक डेंग्यू डे साजरा करण्यात आला.या कार्यक्रमासाठी व्यासपीठवर उपस्थित डॉ.प्रतिक दारुडे वैद्यकीय अधिकारी,सौ वंदना विनोद बरडे अधीसेवीका श्री.सतीश येडे होते.सतिस येडे यांनी प्रास्ताविक केले.
सौ.वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी डेंग्यू विषाणू विषयी मार्गदर्शन केले साफ सफाई, स्वच्छता विषयी माहिती दिली.डाॅ दारूंडे यांनी मार्गदर्शन केले.सूत्रसंचालन सोनाली राईसपाईले व आभार प्रदर्शन व्रुशाली दहेकर यांनी केले.कार्यक्रमाला सर्व अधिकार व कर्मचारी उपस्थित होते.