विकास एज्युकेशन सोसायटी अ-हेरनवरगाव द्वारा संचालित ; विकास विद्यालय अ-हेरनवरगाव शाळेने उत्कृष्ट निकाल लावण्याची जोपासली परंपरा.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२७/०५/२०२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील विकास विद्यालय अरे नवरगाव या शाळेने उत्कृष्ट निकाल देण्याची परंपरा कायम ठेवून ब्रह्मपुरीपरिसरात आपला ठसा उमटविला आहे.
आज जाहीर झालेल्या एस.एस.सी मार्च २०२४ नागपूर बोर्ड परीक्षेच्या निकालात शाळेचा निकाल ९२.४२%असुन एकूण ६१ उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी०४ विद्यार्थी प्राविण्य प्राप्त आहेत .
१) प्रज्वल प्रकाश खोब्रागडे - ७८.८०%
२)समिक्षा रविन्द्र नाकतोडे
७८.४०%
३) आत्मजा रुपचंद दिघोरे
७७ %
४) प्रकाश शेषराव धोटे
७७ %
आत्मजा व प्रकाश यांना सारखे टक्के मिळालेले आहेत.सर्व प्राविण्य प्राप्त व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्था चालक व मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.