सहज सुचलंचे कार्य कौतुकास्पद. - रेखा बारसागडे
राजेंद्र वाढई - उपसंपादक
चंद्रपूर : चंद्रपूर - गडचिरोली ह्या जुळ्या जिल्ह्यातच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रभर नांव पोहचलेल्या महाराष्ट्रातील नामवंत सहज सुचलंचे कार्य उल्लेखनीय व कौतुकास्पद असल्याचे मत चंद्रपूरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्या,रेखा बारसागडे यांनी आज सकाळी एस.के.24 तास च्या प्रतिनिधीशी भ्रमनध्वनीवरुन बोलताना व्यक्त केले.
नुकतीच आपण एकता जुमडे यांची बातमी वाचली.सहज सुचलंच्या संयोजिका रंज्जू दिलीप मोडक यांनी तिची भेट घेत सहज सुचलं परिवार तर्फे एकताचे अभिनंदन केले.
गुणी कलावंताचा गौरव करणे सोबतच शैक्षणिक क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याबद्दल रेखा बारसागडे यांनी सहज सुचलंच्या मुख्य मार्गदर्शिका मायाताई कोसरे अधिवक्ता मेघा धोटे व नलिनी आडपवार यांची प्रशंसा केली.दोन्ही दिग्गज मार्गदर्शिकांनी सहज सुचलंला पुढे नेण्याचा सातत्याने प्रयत्न केला असल्याचे शेवटी बारसागडे म्हणाल्या.